Published On : Thu, Feb 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सामान्य नागरिक हाच महसूल प्रशासनाचा केंद्रबिंदू – श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा

Advertisement

नागपूर : महसूल प्रशासन संगणकीकृत होत असून त्या अंतर्गत येणाऱ्या सेवा नागरिकांना जलद व घरबसल्या मिळाव्यात, यासाठी आवश्यक बदल होत आहेत. सामान्य नागरिक हा महसूल प्रशासनाचा केंद्रबिंदू असून त्यांना जलद गतीने सेवा मिळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे, असे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज सांगितले.

हिंगणा येथे आयोजित फेरफार अदालतीमध्ये श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, उपजिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे व तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर आदींची यावेळी उपस्थिती होती. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा व जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात फेरफार अदालत घेण्यात आली.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत आयोजित करण्यात येत आहे.

नागरिकांना त्यांचे जमिनीचे फेरफार व इतर अनुषंगिक नोंदी अद्ययावत करून घेण्याबाबत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आवाहन केले. तसेच मंडळ अधिकारी व तलाठीस्तरावर फेरफार विहित कालावधीत निकाली काढण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या.

Advertisement

सामान्य नागरिकांचे विहित कालावधी पूर्ण झालेले फेरफार यावेळी मंडळ अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करण्यात आले व अर्जदारास फेरफारची नोंद झालेल्या अद्ययावत सातबाराचे वाटप करण्यात आले.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges