Published On : Tue, Mar 24th, 2020

रस्त्यांवरील बांधकाम साहित्य तातडीने उचलण्याचे आदेश

Advertisement

नागपूर : ‘कोरोना’वर प्रतिबंधासाठी विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे आदेश निघाल्यानंतर तीन दिवसांपासून नागपूर शहरात अघोषित संचारबंदी आहे. त्यातल्या त्यात आता मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केले. यामुळे नागपूर शहरातील रस्ते ओस पडले आहेत. या ओस रस्त्यांवर आता नागरिकांनी टाकलेले बांधकाम साहित्य स्पष्टपणे दिसू लागले आहे. हे साहित्य तातडीने उचलण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.

त्याच अनुषंगाने मनपाच्या लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि मंगळवारी झोनच्या संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश निर्गमित केले आहे. संचारबंदी काळात ठिकठिकाणी रस्त्यांच्या बाजूला पडलेले बांधकाम साहित्य उचलण्यात यावे आणि ज्या परिसरात किंवा भागांत घाण आहे, जेथून मच्छरांची उत्पत्ती होते, अशा ठिकाणी हे साहित्य टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.