Published On : Fri, May 28th, 2021

व्यवसाय शिक्षकांच्या अडचणी बाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट

Advertisement

नागपूर २८ मे समाजातील अतिदुर्बल व वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारभिमुख करण्यासाठी केंद्र शासनाने व्यवसाय शिक्षण योजनेद्वारे राज्यात शासकीय शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या अडचणी बाबत भाजप युवा मोर्चाचे कार्यकारणी सदस्य व महासंघाचे पदाधिकारी यांनी विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

सदर योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रणाची जबाबदारी असलेल्या विभागामार्फत सदर योजनेकडे दुर्लक्ष होत असल्याने समाजातील अतिदुर्बल व वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाच्या या कौशल्याभिमुख शिक्षणाची गुणवत्ता डासळली जात आहे. शासनाद्वारे योजनेची अंमलबजावणी न करता विविध कंपनीना टेंडर देऊन सामने शैक्षणिक क्षेत्राने तीन तेरा वाजविले आहे. तसेच योजने अंतर्गत कार्यरत असणाऱ्या व्यवसाय शिक्षकांना कंपनीच्या बाजारीकरण धोरणामुळे अत्यंत हलाखीचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे शिवाय मागील ५ वर्षा पासून कार्य करणाऱ्या शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले असून त्यांना हतबल केले गेले आहे. कोरोना महामारीदरम्यान स्त्रीधन विकून काही शिक्षकांच्या कुटुंबाने उदरनिर्वाह करायला ११०० शिक्षकाच्या कुटुंबावर कोरोना महामारी दरम्यान उद्भवलेली उपासमारी टाळण्यासाठी विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ याविषयी शासनाला जाब विचारून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आमदार परणय फुके यांनी यांना देखील संबंधित शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा देखील राज्यातील या व्यवसाय शिक्षकांच्या मदतीला धावून आले आहेत.भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी दरम्यान युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. रितजी रहाटे यांच्या नेतृत्वाखाली राहुल खंगार, कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, सारंग कदम, देवा देहनकर, विशाल केचे तसेच महासंघाचे कोषाध्यक्ष अनुकेश मतकर, पराग हटकर, रवी रामटेके, दिपाली निवारे आदी उपस्थित होते.