Published On : Mon, Dec 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

विरोधकांनी गिरीश महाजनांची माफी मागावी; देवेंद्र फडणवीस सभागृहात कडाडले

Advertisement

नागपूर: सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला. त्याचसोबत सलीम कुत्तासोबत महाजन उपस्थित असल्याचा फोटो दाखवला. त्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे अनिल परब आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा मागितला. या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाष्य करत महाजन यांच्या मदतीला धावून आले.

उद्धव ठाकरे सभागृहात आले त्यामुळे कदाचित विरोधकांनी गिरीश महाजन आणि सलीम कुत्ता हा मुद्दा उपस्थित केला असावा, असे फडणवीस म्हणाले.ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते, तिथे सगळ्या पक्षाचे नेते, अधिकारी होते. ते लग्न नाशिकमधील मुस्लीम धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू शहीरे खातिब यांच्या पुतण्याचे होते. त्या लग्नात पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते.

शहीरे खातिब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झाले तिच्या वडिलांच्या सासरमधील एक नातेवाईक दाऊदच्या कुठल्यातरी भावाशी लग्न झाले असा आरोप करण्यात आला होता. पण ज्यांच्याशी लग्न झाला त्यांचा कुठेही दाऊदशी संबंध नाही, कुठलाही आरोप नाह, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत असेही फडणवीस म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.