नागपूर: मानवी तस्करी आणि संघटित लैंगिक शोषणाविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने (AHTU) पाचपावली परिसरात मोठी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. देहव्यापारासाठी महिलांना जबरदस्तीने ढकलणाऱ्या दाम्पत्याला अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.४० ते रात्री ९.३० या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपाजवळ, राणी दुर्गावती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी देहव्यापार सुरू असल्याची ठोस माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
माहितीच्या आधारे क्राईम ब्रँचच्या पथकाने सापळा रचून अॅक्टिव्हा 6G स्कूटरवरून येणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख तौसिफ नियाज कुरेशी (वय २६) आणि झोया तौसिफ कुरेशी उर्फ मखानी राम मिश्रा, रा. पंचशील नगर, पाचपावली अशी झाली आहे. चौकशीत त्यांनी उप्पलवाडी येथील कोमल नितीन पवार हिच्या संगनमताने हे रॅकेट चालवत असल्याची कबुली दिली आहे.
आरोपी महिलांसाठी देहव्यापाराची ठिकाणे ठरवून आर्थिक फायद्यासाठी त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलत असल्याचे तपासात उघड झाले आहे. कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून अॅक्टिव्हा 6G स्कूटर (MH-49-BQ-0782), विविध कंपन्यांचे सहा मोबाईल फोन, ४,५०० रुपये रोख व इतर साहित्य असा सुमारे १.०४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३(२) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ मधील कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, उपायुक्त (डिटेक्शन) राहुल मणिकर, सहायक पोलीस आयुक्त (क्राईम ब्रँच) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU अधिकारी ललिता तोडसे व त्यांच्या पथकाने केली.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





