Published On : Mon, Mar 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; गांजा तस्करी प्रकरणात महिलेला अटक !

ड्रग्स पुरवठ्याचे जाळे उघडकीस
Advertisement

नागपूर: शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थविरोधी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेत नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 5 ने प्रभावी कारवाई करत गांजा तस्करी प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्स पुरवठ्याचे जाळे उघडकीस आले आहे.

माहितीनुसार, 28 मार्चच्या रात्री कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीदरम्यान पोलिसांनी मोहनलाल वाजपेयी नगर परिसरात एका प्लास्टिक कारखान्याजवळ संशयास्पद हालचाल करणाऱ्या तरुणाला अडवले. त्याची तपासणी केली असता, त्याच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीच्या डिकीत पांढऱ्या पिशवीत लपवून ठेवलेला सुमारे 961 ग्रॅम गांजा आढळून आला.

Gold Rate
Mar 30,2026 - Time 10.25Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,500 /-
Gold 22 KT ₹ 1,35,300 /-
Silver/Kg ₹ 2,29,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या गांज्याची अंदाजे किंमत 24 हजार रुपयांहून अधिक असून, आरोपीकडून दुचाकी आणि मोबाईलसह एकूण 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपीची ओळख तेजप्रताप शाहू (वय 30, रा. कळमना) अशी पटली.

पोलिसी चौकशीत शाहूने हा गांजा सलोनी चौधरी (वय 20, रा. प्रेमनगर, शांतिनगर) हिच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार कळमना पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर क्राईम ब्रँचच्या पथकाने तातडीने कारवाई करत 29 मार्च रोजी शांतिनगर परिसरातून फरार असलेल्या सलोनी चौधरी हिला अटक केली. चौकशीदरम्यान तिने ‘फारुख’ नावाच्या व्यक्तीकडून गांजा मिळत असल्याची माहिती उघड केली आहे.

सध्या अटक करण्यात आलेल्या महिलेला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून निरीक्षक विनायक गोळे व त्यांच्या पथकाने यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement