कन्हान : – कुमार क्रिकेट उत्सव मंडळ केरडी व्दारे क्रिकेट स्पर्धेचे केरडी गावात आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मा कैलास खंडार शिनसेना साटक सर्कल प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले .
या प्रसंगी नरेश भोंदे, माजी सरपंच प्रकाश पड़ोळे, माजी उपसरपंच लक्ष्मण खंडार, गेंदलाल बेंदुले, प्रकाश काठोके, वामन चौधरी, विनायक काठोके, राहुल वानखेड़े, चन्द्रभान वानखेड़े, धनराज खंडार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन केरडी विरूध्द एंसबा यांच्यात दर्शनिय सामना खेळुन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यात केरडीचा संघ विजयी झाला. दररोज सामने घेण्यात येणार असुन१४ जानेवारी २०१९ ला बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीते करिता कुमार क्रिकेट उत्सव मंडळ केरडी चे अमोल वानखेड़े, अमोल ठाकरे, सचिन फालके, राहुल बांगरे, पिंटू खंडार, गजानन लेकुरवाळे, आदित्य ठाकरे, अक्षय हिवसे आदी परिश्रम घेत आहेत.