Published On : Wed, Dec 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

प्रत्येक आमदाराला फक्त दोन प्रवेशिका, दिल्लीतील घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय

Advertisement

नागपूर: लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरुणांनी तिथून खाली उडी मारली. त्यानंतर ते एका बाकावरुन दुसऱ्या बाकावर उड्या मारत पळत होते. एकानं बूटातून स्प्रे काढला. त्यात पिवळ्या रंगाचा वायू होता. त्यानं स्प्रे मारल्यानंतर सदनात पिवळा धूर पसरला. या घटनेनंतर विधिमंडळ सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक आमदाराला फक्त दोन प्रवेशिका देता येईल असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले.

एका खासदाराने दिलेल्या व्हिजीटर पासेसवर हे तरूण प्रेक्षक दीर्घेत आले होते. असा प्रकार विधिमंडळातही घडू शकतो असे पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षात आणून दिलेे. तर विधिमंडळ परिसरात चालायलाही जागा नव्हती असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्या नंतर प्रत्येक आमदाराला फक्त दोन प्रवेशिका देता येईल असा निर्णय अध्यक्षांनी दिला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.