मुंबई : ठाकरे गटाकडून कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली. मात्र श्रीकांत शिंदे हे दोनदा खासदार झाले ते शिवसैनिकांमुळे, ज्या शिवसैनिकांनी त्यांना खासदार केलं तेच शिवसैनिक आता त्यांचा पराभव करतील,अशी टीका दरेकर यांनी केली.
कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाले.
दरम्यान शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतरही वैशाली दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही.दरेकर यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली होती. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर या राज ठाकरे यांच्यासोबत मनसेमध्ये गेल्या.
2009 मध्ये त्यांनी मनसेमधून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधले.