Published On : Sat, Jul 22nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

ऑनलाईन गेमिंगद्वारे उद्योगपतीची 58 कोटींची फसवणूक; आरोपीच्या घरात सापडलं मोठं घबाड

Advertisement

ऑनलाइन गेमिंगचे (Online Game) अ‍ॅप तयार करून उद्योगपतीची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात (Gondia Crime) समोर आला आहे. पोलिसांनी (Nagpur Police) याप्रकरणी पोलिसांनी जवळपास 10 कोटींची रक्कम ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातूनच ही रक्कम जप्त केली आहे. अनंत उर्फ सोमटू जैन असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीचे फिर्यादीशी मैत्रीपूर्ण संबंध होते. मागील दोन वर्षांपासून या गेमच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने फसवणूक करत आरोपीने तब्बल 58 कोटी रुपयांचा फिर्यादीला गंडा घातला. नागपूर पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच तपास सुरु करण्यात आला. आरोपी हा गोंदियाचा असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता मोठी रक्कम सापडली आहे. आरोपीच्या घरातून पोलिसांना कोट्यावधी रुपये मिळून आले.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्या पैशाची मोजमाप सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः दहा कोटी रुपयांची मोजणी झाली आहे. तसेच चार किलोचे सोनंही घरात मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.