Published On : Fri, Sep 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

सना खानच्या मृतदेहाची माहिती देणाऱ्याला मिळणार एक लाख, नागपूर पोलिसांनी जाहीर केले बक्षीस !

नागपूर : भाजप नेत्या सना खान यांच्या हत्याकांडाचे गूढ कायम आहे. कारण अद्यापही सनाचा मृतदेह मिळालेला नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित
साहूने २ ऑगस्ट रोजी सना यांची हत्या केल्यावर त्यांचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली.

त्यानंतर नागपूर पोलिसांनी सनाचा मृतदेह शोधण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या. नागपूर पोलिसांना आता हिरन नदीच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांकडून मृतदेहाबाबत काही तरी माहिती यावी यासाठी एक लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. जी व्यक्ती मृतदेहाबाबत माहिती देईल त्याला ही रक्कम देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

Gold Rate
May 14- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,63,000 /-
Gold 22 KT ₹ 1,51,600 /-
Silver/Kg ₹ 2,92,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सना खान हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी अमित शाहू सह धर्मेंद्र यादव, कमलेश पटेल, रब्बू यादव या आरोपींनादेखील अटक केली. तसेच मध्यप्रदेशमधील कॉंग्रेसचे आमदार संजय शर्मा यांची चौकशीदेखील झाली. मात्र अद्यापही सना यांचा मृतदेह सापडलेला नाही.याप्रकरणी शाहू पोलिसांची दिशाभूल करत असल्याची शंका पोलिसांना आहे.

आरोपींना शिक्षा होण्यासाठी मृतदेह किंवा इतर महत्त्वाचे पुरावे सापडणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सना खान यांच्या मृतदेहाची माहिती देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. या वृत्ताला मानकापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनीही दुजोरा दिला. हिरन नदी व आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत बक्षिसाबाबतची माहिती दिली जात असल्याचे त्या म्हणल्या.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement