Published On : Fri, Jun 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात चालत्या दुचाकीवर एसी सिलेंडर फुटल्याने एकाच मृत्यू

Advertisement

नागपूर :वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना समोर आली आहे.चालत्या दुचाकीवर एसी कुलींग सिलेंडर फुटल्यामुळे जखमी झालेल्या मेकॅनिकचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. योगेश ज्ञानेश्वर तांडेवार (२७, सोनबानगर, वाडी) असे मृतकाचे नाव आहे.

माहितीनुसार, योगेश हा त्रिमूर्ती नगर येथील डाईकिन कंडिशनर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कामावर होता. तो एअर कंडिशनमध्ये एसी कुलिंग गॅस भरण्याचे काम करायचा. ५ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तो कंपनीतीलच सुधीर हाडगे सोबत दुचाकीने निघाला.

Gold Rate
Sept 16,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,400 /-
Gold 22 KT ₹ 1,41,400 /-
Silver/Kg ₹ 2,33,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याने एसी गॅस कुलिंग सिलेंडर दुचाकीवर पायाजवळ ठेवले होते. वडधामना संगम मार्गाजवळून जात असताना अचानक सिलेंडर फुटला.यात योगेशसह सुधीर गंभीर जखमी झाले.

उपचारासाठी दोघांनाही शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. तर सुधीरवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी वाडी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.