नागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने गुरुवारी रात्री यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिलगाव येथील एका २४ वर्षीय तरुणाला ६० हजार ६०० रुपये किमतीच्या 3 किलो 30 ग्रॅम किमतींच्या गांज्यासह अटक केली. सय्यद जीशान सय्यद रिजवान हैदर रिझवी (24 रा. बकारा तबेला, जुनी कामठी ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कक्ष भिलगाव परिसरात रात्री नऊच्या दरम्यान गस्त घालत होते.
पोलिसांना 12 वाजताच्या सुमारास एक संशयित व्यक्ती दिसली. या व्यक्तीची चौकशी केली असता आरोपीने त्याच्या ठावठिकाणाबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
यादरम्यान पोलिसांनी त्याची व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याजवळ 60,600 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





