Published On : Wed, Jun 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात घरफोडीसह वाहन चोरीप्रकरणी एकास अटक, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ ने आज दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. अजनी आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये एकाला अटक करण्यात आली असून, जवळपास १४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्ह्यांची माहिती अशी की, अजनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी प्रकरणात आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील वाहन चोरी प्रकरणात तपास करत असताना, गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ ने सुमित पवन सोनटक्के (वय २४, रा. अजनी रेल्वे कॉटर) याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत दोन विधी संघर्ष बालकांचाही सहभाग निष्पन्न झाला आहे.

तपासादरम्यान आरोपीकडून १६७.०४ ग्रॅम वजनाचे पिवळ्या धातूचे दागिने, अंदाजे किंमत १३ लाख ३९ हजार २०० रुपये; ४०० ग्रॅम वजनाचे पांढऱ्या धातूचे दागिने, किंमत अंदाजे ४५ हजार रुपये; तसेच चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (MH 31 EW 4121) ज्याची किंमत अंदाजे २० हजार रुपये आहे, असा एकूण १४ लाख ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला अजनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरु आहे.

Advertisement

या कारवाईबद्दल गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ चे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.