Advertisement
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.