Published On : Sat, Jun 16th, 2018

सेवानिवृत्तीच्या दिवशी इंजिनिअर घोड्यावरुन आला ऑफिसला !

Advertisement

बंगळुरु : रुपेश वर्मा या सॉफ्टवेअर इंजिनिअरने नोकरीचा शेवटचा दिवस ऑफिसला घोड्यावर येऊन साजरा केला! त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रुपेश बंगळुरुमधील रिंग रोड येथील अॅम्बेसी गोल्फ रिंग कंपनीत काम करत होता.

Advertisement
Advertisement

नोकरीचा कंटाळा आल्यामुळे त्याने राजीनामा दिला. तो म्हणतो,’सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून आम्ही परदेशी कंपन्यांसाठी काम करतो. सॉफ्टवेअरशी संबंधित कठीण समस्या सोडवतो. हेच काम आम्ही स्वत:च्या देशासाठी का करु शकत नाही? देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्याने नोकरी सोडली. आता स्वत:चं स्टार्टअप सुरु करण्याचा विचार आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ऑफिसमधला अखेरचा दिवस, असा फलक त्याने घोड्यावर होता. सकाळी सात वाजता निघालेला रुपेश ट्रॅफिक आणि घोड्याच्या विश्रांतीमुळे दुपारी दोन वाजता ऑफिसला पोहोचला. पण घोड्यावर बसून आल्याने त्याला कंपनीच्या गेटवरच अडवण्यात आलं. मात्र घोडाही प्रवासाचं साधन आहे, असं म्हणत रुपेश घोड्यावर बसूनच कंपनीच्या कॅम्पसमध्ये आला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement