Published On : Sat, Sep 25th, 2021

पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केले अभिवादन

नागपूर : एकात्म मानवतावादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पक्षातर्फे अभिवादन केले.

ऍड. मेश्राम यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

याप्रसंगी प्रभाग अध्यक्ष सुरेश बारई व अशोक देशमुख, राम सामंत, अनंता शास्त्रकार, सुर्यकांत गजभिये, प्रीत ढोले, विक्रम डुंमरे, किशोर सायगन आदी उपस्थित होते.

शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवून त्यांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ त्यांची जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरी केली जाते.