Published On : Mon, May 1st, 2023

महाराष्ट्र दिनानिमित्त आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या हस्ते मनपात ध्वजारोहण

उत्कृष्ट कामगिरीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन
Advertisement

नागपूर: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवार (ता. १) नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील हिरवळीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात आयुक्तांनी मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, मुख्य अभियंता श्री. राजू गायकवाड उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे , उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त रविंद्र भेलावे, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख श्री. महेश धामेचा, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, शिक्षण अधिकारी राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी श्री. पियूष आंबुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, मनपा आयुक्तांच्या पत्नी यांच्यासह सर्व अधिकारी, अभियंता व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शभेच्छा दिल्या. तसेच नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्याचे नागपूर महानगरपालिकेचे उद्दीष्ट पुढे ठेवले आहे. याकरिता जनतेची सहभाग आणि सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. तरी प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरच्या ससाकारण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी यावेळी केले. याशिवाय नागपूर महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जी 20 परिषद, शहार सौंदर्यीकरण, नाविन्यपूर्ण योजना राबविणे आदी बाबींमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात सर्वप्रथम आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर आयुक्तांनी मनपाच्या अग्निशमन विभागाच्या परेडचे निरीक्षण केले, यावेळी केंद्र अग्निशमन अधिकारी श्री. भगवान बी. वाघ. अग्निशमन अधिकारी श्री. दिलीप पी. चव्हान, अग्निशमन अधिकारी श्री. प्रकाश एन. कावडकर यांच्या नेतृत्वात अग्निशमन जवानांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांना मानवंदना देण्यात आली. तसेच अग्निशमन सेवेत उत्कृष्ट काम केल्या बददल मा. राष्ट्रपती भारत सरकार यांच्या वतीने २६ जानेवारी २०२१ या प्रजासत्ताक दिनी अग्निशमन सेवेतील श्री. धर्मराज नारायणराव नाकोड सेवानिवृत्त सहा.अग्निशमन अधिकारी यांना उत्कृष्ट सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक मा. राज्यपाल यांचा हस्ते दि.१४ एप्रिल २०२३ रोजी मंत्रालय मुंबई येथे देण्यात आलेले आहे. उत्कृष्ट सेवापदकाबददल आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय भारतीय स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचाकरिता महाराष्ट्र शासनामार्फत १५३ पदके प्राप्त झाले आहे. ही पदके आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या हस्ते प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी.चंदनखेडे यांना सुर्पत करण्यात आले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी पोहरे यांनी केले.