Published On : Fri, Jan 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

भारतीय पत्रकारिता स्थापना दिवस निमित्त नॅशनल मीडिया फाउंडेशन नवी दिल्ली राज्य समिती महाराष्ट्र तर्फे पत्रकार गौरव पुरस्कार 2025 वितरण सोहळा संपन्न

Advertisement

नवी दिल्ली – नॅशनल मीडिया फाउंडेशन नवी दिल्ली राज्य समिती महाराष्ट्र यांच्या वतीने भारतीय पत्रकारिता स्थापना दिवस निमित्त आज दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात “पत्रकार गौरव पुरस्कार 2025” अंतर्गत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला रामटेक लोकसभेचे खासदार माननीय श्री. श्याम कुमार बर्वे, विधान परिषद सदस्य माननीय श्री. आमदार कृपाल जी तूमाणे, नॅशनल मीडिया फाउंडेशन नवी दिल्ली चे अध्यक्ष श्री. राजेंद्र जैन आणि महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोल जी गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या विशेष सोहळ्यात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. विनोदी मसराम यांना आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल “आदिवासी समाज भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सामाजिक व आदिवासी विकासासाठीच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

Advertisement

कार्यक्रमात पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनेक पत्रकारांचा गौरव करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच समाजहिताच्या दृष्टिकोनातून योग्य दिशा मिळावी, यासाठी विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नॅशनल मीडिया फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवर व पत्रकारांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शुभेच्छा दिल्या व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.