Published On : Fri, Nov 24th, 2023
By Nagpur Today Nagpur News

संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा !

नवी दिल्ली: संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकर यांचा पुतळा नाही. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. 7 फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी वकिल पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातील बागेत डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवला जाईल.

Gold Rate
May 14- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 159,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,000 /-
Silver/Kg ₹ 2,70,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तीन वकिलांनी भारताच्या सरन्यायाधीशांना लिहिले होते पत्र –
प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांनी या पुतळ्याचे शिल्प केले आहे, जे सध्या हरियाणामध्ये याला फिनिशिंग टच देत आहेत.

पुतळ्याचे व्यासपीठ सध्या जवळपास 50 मजुरांसह पूर्णत्वाकडे जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात सध्या महात्मा गांधींचा एक पुतळा आहे. जो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या समोर आहे. गेल्या वर्षी, तीन वकिलांनी भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती.
image.png

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement