Published On : Tue, Jun 18th, 2019

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार 1 लक्ष 7 हजार 266 पुस्तके मोफत

कामठी :-नवीन शैक्षणीक सत्राला 26 जूनपासून सुरुवात होणार आहे .समग्र शिक्षा अभियानांतर्गत पाठयपुस्तके पुरविण्याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी कामठी तालुक्यातील वर्ग 1 ते 8 वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 1 लक्ष 7 हजार 266 पुस्तका वाटप होणार आहेत.तालुका शिक्षण विभागाने केलेल्या मागणीनुसार फक्त1059 पुस्तके प्राप्त झाली नसून इतर सर्व पुस्तके प्राप्त झाली आहेत.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यना सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत .यात पाठयपुस्तकाचाही समावेश आहे.येत्या 26 जून पासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे.या अनुषंगाने मागील महिन्या भरापासून पंचायत समितीचे शिक्षण विभाग कामाला लागले आहे.

कामठी तालुक्यातील 1 ते 8 वर्गापर्यंतच्या एकूण विद्यार्थ्यांसाठी 1 लक्ष 7 हजार 266 पुस्तकाची मागाणी पंचायत समिती च्या शिक्षण विभागाने केली होती शाळेतील कोणताही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभाग कसोशीचे प्रयत्न करीत आहेत यामाध्यमातून मुलांची उपस्थिती वाढविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे असे प्रयत्न केले जात आहेत .


यानुसार मराठी माध्यमाच्या 40 हजार 468, हिंदी माध्यमाच्या 17 हजार 250, इंग्रजी माध्यमाच्या 36 हजार 796, उर्दू माध्यमाच्या 12 हजार 752 पुस्तके असे एकूण 1 लक्ष 7 हजार 266 पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे यातील 1059 पुस्तका अजूनही प्राप्त झालेल्या नाहीत.