नागपूर: महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Advertisement

Advertisement
Advertisement