कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आशा हॉस्पिटल समोरील मार्गावरून योद्धा पिकअप वाहन क्र एम एच 49 ए टी 0027 ने 15 गोवंश जनावरे निर्दयतेने वाहून नेत असलेल्या वाहनाचा जुनी कामठी पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने वाहुन नेत वाहनाचा अपघात करून वाहन रस्त्यातच सोडून घटनास्थळहून पळ काढण्यात यश गाठले तर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेत वाहनात कत्तलीसाठी जात असलेले 15 गोवंश जनावरे ताब्यात घेत सदर जनावरे नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षीत हलविण्यात आले यानुसार कत्तलीसाठी नेत असलेल्या 15 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कामगिरी काल सायंकाळी 7 दरम्यान केली असून यातील पसार आरोपी वाहनचालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाहितुन योद्धा पिकअप वाहन एम एच 49 ए टी 0027 किमती 4 लक्ष 50 हजार रुपये, एकूण 15 गोवंश जनावरे किमती 2 लक्ष 25 हजार रुपये, एक टॅम्बो कंपनीचा मोबाईल किमती 800 रुपये व नायलॉन दोऱ्या अशा एकूण 6 लक्ष 75 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही यशस्वी कामगिरी डीसीपी मनीष कलवानिया, एसीपी नयन अलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे , पोलीस उपनिरीक्षक के बी माकने, किशोर मालोकर, सूचित गजभिये, अश्विन साखरकर, शैलेश यादव यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.