Published On : Tue, Oct 3rd, 2017

महावितरणचे प्रादेशिक संचालक कार्यालय; प्रभावी ग्राहकसेवेची वर्षपुर्ती

Advertisement

नागपूर : वीज ग्राहकांना योग्य दाबाने व अंखंडीत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणे विदर्भात तब्बल 117 वीजौपकेंद्रे प्रस्तावित केली असून त्यापैकी 29 उपकेंद्रांची कामे पुर्ण झाल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्याच्या समस्या निकाली लागल्या आहेत. याशिवाय वर्षभरात सुमारे 1.32 लाख नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयाने स्थापनेपासून एका वर्षाच्या आत या सर्व कामांचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करीत विदर्भातील ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचे कार्य केले आहे.

वीज ग्राहकांना लहान-सहान कामांसाठी वारंवार मुंबईला जाण्याची गरज भासू नये, अनेक प्रकारच्या प्रस्तावांना थानिक स्तरावरच मंजूरी मिळावी यासाठी महावितरणच्या कामांचे विकेंद्रीकरण करण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारीत राज्याचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रादेशिक संचालक कार्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2 ऑक्टॉंबर 2016 रोजी संपूर्ण विदर्भासाठी नागपूर येथे प्रादेशिक संचालक कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या एका वर्षाच्या कार्यकाळात या कार्यालयाने प्रभावी आणि तत्पर ग्राहकसेवेसाठी विविध प्रकारांच्या उपाययोजना करीत विदर्भातील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचे कार्य केले आहे.

Gold Rate
June 152026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,300 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या एका वर्षाच्या काळात प्रादेशिक संचालक कार्यालयाने ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद वाढवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर विशेष भर दिला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करीत महावितरणच्या नागपूर येथील प्रादेशिक संचालक कार्यालयाने आपल्या प्रथम वर्षातच ग्राहकसेवेमध्ये यशाचे उंच शिखर गाठले आहे. विदर्भात महावितरणचे सुमारे 47 लाख वीज ग्राहक असून त्यापैकी तब्बल 70 टक्के वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करीत ग्राहकांच्या तक्रारींचे थेट निराकरण करण्यासोबतच त्यांनी केलेल्या वीजेचा मासिक वापर, वीज देयक, वीज खंडीत होणार असल्याच्या सुचनेसोबतच अनेक महत्वाची माहिती थेट एसएमएसच्या माध्यमातून त्यांना मिळू लागल्याने महावितरणचे काम अधिक पारदर्शक आणि तत्पर होण्यास मदत झाली आहे.

वीज मीटर वाचनात मानवीय हस्तक्षेप टाळून ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी विदर्भातील अडीच हजारांपेक्षा अधिक उच्चदाब ग्राहकांना स्वयंचलीत मीटर वाचन पद्धतीने नोंदी घेत वीजबिल दिल्या जात असून लघुदाब औद्योगिक ग्राकहांसाठीही ही पद्धती नुकतीच सुरु करण्यात आली आहे. याशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून लघुदाब ग्राहकांचे मीटर वाचन होत असल्याने त्यात मानवी हस्तक्षेप पुर्णपणे नाहिसा करण्यात महावितरणला विशेष यश मिळाले आहे. एखाद्या ग्राहकाच्या मीटरचे वाचन काही कारणास्त्व झाले नसल्यास ग्राहकाला स्वतः आपल्या मीटरचा फ़ोटो पाठविण्याची सुविधाही या ॲपमध्ये उपलब्ध असल्याने मीटर वाचनातील तक्रारी आणि अनियमितता नाहिश्या करण्यातही महावितरण यशस्वी ठरले आहे.

विदर्भातील शेततळ्यांमधील पाण्याचा उपसा करण्यास योग्य दाबाने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी पुर्व विदर्भ स्पेशल पॅकेज अंतर्गत तब्बल 700 कोटींची योजना मंजूर झाली असून त्यापैकी 350 कोटींची कामेही प्रस्तावित करण्यात आली आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही विदर्भातील बहुतांश जिल्हातील वीज ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत, त्या समस्यांचे जागेवर निराकरण करण्यासाठी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत हे देखील विशेष प्रयत्नरत आहेत.

शहरी भागातील विज वितरण यंत्रणा बळकटीकरणासाठी एकात्मिक विद्युत विकास योजना आणि ग्रामिण भागासाठि दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गत प्रादेशिक संचालक नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकार्ये सुरू असून त्यापैकी अनेक कामे पुर्ण होत आली आहेत. ग्राहक सेवेप्रती सदैव कटीबद्ध असलेल्या महावितरणला यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी येणारा खर्च आणि महावितरणचा एकूणच आर्थिक डोलारा लक्षात घेता वीज ग्राहकांनीही अधिकृत वीजेचा वापर करून नियमितपणे वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

SEHAT KI BAAT - Dr. Rajan Barokar EPISODE - 5

SEHAT KI BAAT - Dr. Rajan Barokar EPISODE - 5

तलाक के बाद शादी से मुकरा प्रेमी.. #nagpurnews #crime #latestnews

तलाक के बाद शादी से मुकरा प्रेमी.. #nagpurnews #crime #latestnews

भरतवाड़ा में युवक की चाकू गोदकर हत्या.. #nagpurnews #crime #murdernews

भरतवाड़ा में युवक की चाकू गोदकर हत्या.. #nagpurnews #crime #murdernews

महाविकास आघाड़ी ने भाजपा पर साधा निशाना  #nagpurnews #MVA #Congress #PoliticalNews

महाविकास आघाड़ी ने भाजपा पर साधा निशाना #nagpurnews #MVA #Congress #PoliticalNews

रवि भवन के सामने ओला ड्राइवर का शव बरामद.. #nagpurnews #oladriver #death

रवि भवन के सामने ओला ड्राइवर का शव बरामद.. #nagpurnews #oladriver #death

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges