Published On : Wed, Mar 20th, 2019

प्रताप नगर जलकुंभ दुषित पाणी समस्या: मनपा – OCW ची कारवाई

Advertisement

मनपा-OCWची लक्ष्मी नगर झोन चमू समस्या सोडविण्यासाठी १५ मार्चपासून अहोरात्र कार्यरत
स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी ३ विशेष टँकर्स रुजू

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर लक्ष्मी नगर झोन चमू यांनी १५ मार्च (ज्या दिवशी OCWकडे दुषित पाण्याची तक्रार आली) पासून अहोरात्र परिश्रम घेत दुषित पानाची समस्या सोडविली आहे.

येथे उल्लेखनीय आहे कि प्रताप नगर जलकुंभ कमांड एरियातील प्रताप नगर, विद्या विहार कॉलोनी, मॉडर्न सोसायटी, नवनिर्माण सोसायटी इत्यादी भागांमध्ये १५ मार्च रोजी दुषित पाण्याची समस्या उद्भवली.

· १५ मार्च रोजी सकाळच्या पाणीपुरवठ्यानंतर मनपा-OCW कडे प्रताप नगर, विद्या विहार कॉलोनी, मॉडर्न सोसायटी, नवनिर्माण सोसायटी, ई. या भागांतून दुषित पाण्याच्या तक्रारी आल्या.

· जल वितरण व्यवस्थेच्या सखोल पाहणीनंतर मनपा-OCW लक्ष्मी नगर झोन चमू यांनी ताबडतोब शोध सुरु केला. प्रताप नगर जलकुंभ कमांड एरिया हा मोठा भाग असल्यामुळे व सर्व जलवाहिन्या जमिनीखाली असल्याने दुषित पाण्याचा अचून स्रोत व कारण शोधून काढणे अवघड होते. मात्र मनपा-OCW यांनी अथक परिश्रम करत स्रोत शोधून काढला.

· १५ मार्च रोजी – मॉडर्न सोसायटी येथे २ ठिकाणी खोदकाम करून पाहणी

· १६ ते १८ मार्च दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मनपा-OCW ने लाऊड स्पीकरवरून सूचना दिल्या व नागरिकांना पाणी पिण्यासाठी न वापरण्याबाबत जागरूक केले. याचसोबत संपूर्ण भागात घरगुती वापरासाठी टँकर पुरविण्यात येणार असल्याचे कळविले.

· मनपा-OCWने आपली लीक डिटेक्शन टीम रात्रभर कामी लावून दुषित पाण्याचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. बँक ऑफ इंडिया, प्रतापनगर येथेदेखील खोदकाम करण्यात आले. मात्र स्रोत सापडला नाही.

· १८ मार्च – पहाटे ४.३० वाजता पुन्हा एकदा लीक डिटेक्शन करण्यात आले व जवळपास सकाळी ५ वाजता १०० मिमी व्यासाच्या गायत्री भोजनालयासमोरील सिवेज चेंबरमध्ये गळती आढळून आली. ताबडतोब खोदकाम करून तो वाहिनी दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आली.

· १८ मार्च रोजीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाटील हॉस्पिटलजवळ खोदकाम करण्यात आले २ १८ आणि १९ मार्च रोजी संपूर्ण लाईनचे फ्लशिंग करण्यात आले. त्यानंतर काही घरांमधील नळाचा पाणीपुरवठा तपासून बघण्यात आला. हे पाणी स्वच्छ व दुर्गंधीरहित आढळले.

· रेसिड्युअल क्लोरीनचे प्रमाण तिथल्या तिथे तपासण्यात आले. इतरही ठिकाणी क्लोरिनचे प्रमाण तपासण्यात आले.

दरम्यान. दुषित पाण्याची समस्या सुरु असताना मनपा-OCWने ३ (८००० लिटर क्षमतेचे) टँकर १६ मार्चपासून या भागात रुजू केले होते. जेणेकरून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करणे शक्य झाले. या टँकर्सने किमान ३० फेऱ्या बाधित भागांमध्ये केल्या.

तसेच, मनपा-OCWच्या अनाउन्समेंट व्हॅनने वारंवार नागरिकांना दुषित पाण्याच्या समस्येबाबत जागरूक करण्यात आले व नळाच्या पाण्याऐवजी टँकरद्वारे पुरविण्यात येत असलेले पाणी वापरण्याबाबत सांगण्यात आले. OCWच्या कम्युनिकेशन चमूने प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना माहिती दिली.

· १९ व २० मार्च या दोन्ही दिवशी पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (RPHL) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असून त्याचे अहवाल २५ मार्चपर्यंत अपेक्षित आहेत.

दरम्यान, प्रसिद्ध चिकित्सक डॉ यशवंत शिंदे, विद्या विहार कॉलोनी यांनी OCWच्या ही कठीण परिस्थिती सांभाळण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केलेत्यांनी सांगितले कि ही समस्या १५ मार्च रोजी सुरु झाली. OCWने दर एक दिवसाआड संपूर्ण भागात टँकर पुरविले. त्यांची चमू दिवसरात्र कार्यमग्न होती. मी स्वत: यांच्या लोकांना रात्री उशिरापर्यंत काम करताना पाहिले आहे.

श्री शंकर कोरडे आणखी एक प्रसिद्ध नागरिक यांनी सांगितले कि जरी ही अचानक उद्भवलेली समस्या असली तरी ही समस्या मानवनिर्मित नव्हती. मनपा-OCWच्या चमूने अत्यंत विचारपूर्वक व पद्धतशीरपणे हाताळली. १६ मार्चपासून नियमित टँकर पुरविण्यात आले.

दरम्यान पुढील २ ते ३ दिवस तज्ञांनी बाधित भागातील नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला आहे. मनपा-OCW यांनी प्रताप नगर भागातील नागरिकांचे व जनप्रतिनिधींचे त्यांच्या सहकार्यासाठी आभार मानले आहे.