Published On : Wed, Jul 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

अजिबात काळजी करू नका नागपूरकर !!! ….

Advertisement

कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरून येणारे पिण्याचे पाणी शुद्ध आणि सुरक्षितच आहे

घरातील नळाला फ्लाय ऐश युक्त पाणी अजिबात नाही

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर,: नागपूरकरांनो, (मुख्यतः: उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपुरातील), अजिबात काळजी करू नका , जरी फ्लाय ऐश कन्हान नदी (कोलार नदी मार्गे) मध्ये दिसत असली आणि येत जरी असली तरीही नागपूर महानगर पालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर आपल्या घरातील नळाला कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून …शुद्ध आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचाच पुरवठा करीत आहे . हे पाणी संपूर्णपणे राख विरहित आहे.

जरी काही स्वयंसेवी संस्था, वृत्तपत्रे किंवा इतर माध्यम मधून बातम्या येत आहेत कि कन्हान नदीच्या पाण्यातून राख मिश्रित पाणी येत आहे ? तरीही नागपूर महानगर पालिकेच्या आणि ऑरेंज सिटी वॉटर च्या कन्हान जलशुद्धीकरण वरून उत्तर, पूव आणि दक्षिण नागपुरात कुठल्याही पद्धतीचा राख मिश्रित पाणीपुरवठा केल्या जात नाही अथवा पिण्याच्या पाण्यामध्ये कुठलीही प्रकारची राखेची मात्र आढळून आलेली नाही , हे देखील तितकेच सत्य आहे.

Advertisement

जसा तांत्रिकदृष्ट्या कुठलाच जलशुद्धीकरण केंद्र हे राखमिश्रित पाणी शुद्धीकरण करू शकत नाही तसेच कन्हान जलशुद्धीकरण केंद्र देखील राखमिश्रीत कच्चे पाणी जल शुद्धीकरण करू शकत नाहीच. त्यावेळेस पम्पिंग बंद करून कच्च्या पाण्याची उचल न करणे हेच योग्य असते.

पण त्याच वेळी हे देखील सत्य आहे कि कन्हान नदी मध्ये कोलार नदी मार्गे डाव्या दिशेने राखाडी युक्त पाणी येत आहे तेव्हा नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर ने उजव्या बाजूला असलेले इनटेक विहिरीचे कच्चे पाणी उचलणारे पंप बंदच करून टाकले ज्यायोगे हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येणारच नाही. परंतु त्याचवेळेस कन्हान नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या (जुनी कामठी ) भागातील इनटेक विहिरीचे पम्पिंग करून कच्चे पाणी घेतल्या जात आहे. ज्या पाण्यामध्ये राखेचे प्रमाण अजिबात नाही.

साधारणतः: गेल्या १० जुलै पासून कोलार नदी च्या आणि कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे डाव्या भागात असलेले कच्च्या पाण्याची उचल करणारे पंप बंदच आहे आणि जोपर्यंत मनपा आणि संपूर्णपणे ह्या निर्णयाला येत नाही कि फ्लाय ऐश नदीमध्ये येत नाही आहे तोपर्यंत पम्पिंग बंद राहील.

कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरून जवळपास २८ टाक्या ज्या आसि नगर झोन , नेहरू नगर झोन , लकडगंज झोन आणि सतरंजीपूरा झोन ह्या भागात येथे आहेत येथे पाणीपुरवठा होत असतो, ह्या प्रकारामुळे जरी ३० ते ३५ MLD (दशलक्ष लिटर) कमी पाणी मनपा व ऑरेंज सिटी वॉटर ह्या भागात पुरवठा करू शकत असली आणि ते हि संपूर्ण गुणवत्ता चेक करून आणि त्यामुळे काही भागात कमी दाबाने अथवा काही ठिकाणी कमी प्रमाणात पाणी मिळत जरी असले तरीही ह्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत काही हि फरक नाही. तुमच्या घरी नळाला येत असलेले पाणी हे पूर्णपणे शुद्ध आणि सुरक्षित आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.