Published On : Fri, Nov 2nd, 2018

OCWचे केरळ मदतनिधीत रु.२.८२ लाखांचे योगदान

नागपूर: ऑरेंज सिटी वॉटरच्या कर्मचाऱ्यांनी नुकतेच केरळ मदतनिधीला रु.२.८२लाखांचे योगदान दिले आहे. OCWकर्मचाऱ्यांच्यावतीने OCWचे CEO श्री संजय रॉय व निदेशक – HR व PR श्री केएमपी सिंह यांनी रु.२,८१,७६१चा धनादेश जिल्हाधिकारी श्री अश्विन मुद्गल यांच्या सुपूर्द केला.

Advertisement

ऑरेंज सिटी वॉटर नागपूर शहरात नागपूर महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी २४x७ पाणीपुरवठा प्रकल्पाची अमलबजावणी करत आहे. यासोबतच ऑरेंज सिटी वॉटर अनेक सामाजिक उपक्रम जसे गरीब वस्त्यांमधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, जलसंवर्धन जागृतीपर कार्यक्रम हाती घेत असते तसेच नागपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणाऱ्या नागनदी बचाव मोहीम, वृक्षारोपण इत्यादी उपक्रमांत आपला सक्रीय सहभाग नोंदवत असते.

Advertisement

OCW ने उपाय या NGOच्या सोबतीने दुर्लक्षित गटातील मुलांच्या शिक्षणासाठी पहिले रीच & टीच सेंटर लक्ष्मी नगर झोन येथे सुरु केले आहे.

Advertisement

येथे उल्लेखनीय आहे कि, OCW २४x७ योजनेचे फायदे, पाण्याचा विवेकी वापर याबाबत मोहल्ला सभा, वॉटर फ्रेंड्स, विद्यार्थ्यांसाठी जागृतीप्र कार्यक्रम, ई. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागृती करत असते. तसेच टोलफ्री क्रमांक, आरोग्य चिकित्सा शिबिरे या माध्यमातून ग्राहक सेवांचे नवनवीन मापदंड स्थापित करत असते. यासर्वांमुळे नागरिकांसह एक घट्ट नाते बनविण्यात OCWला यश आले आहे.

छायाचित्र टीप: जिल्हाधिकारी श्री अश्विन मुद्गल यांना केरळ मदतनिधीसाठी रु.२.८२लाखांचा धनादेश देताना OCW CEO संजय रॉय व निदेशक HR &PR श्री केएमपी सिंह जिल्हाधिकारी कार्यालयात.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement