Published On : Tue, May 21st, 2024
By Nagpur Today Nagpur News

OCW ने ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या सहकार्याने विविध क्षेत्रांमध्ये “जल संवर्धन, एक पहल, जो सँवारे कल” आयोजित केले…

Advertisement

नागपूर, 18 मे 2024, कडक उन्हाळ्याच्या तापमानाला सुरुवात झाल्याने,पाणीटंचाईच्या वाढत्या भडक्याने सक्रिय उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रतिसादात, ऑरेंज सिटी वॉटर (OCW), ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सहकार्याने, “जल संवर्धन, एक पहल, जो संवारे कल…” या मोहीम ची सुरूवात केली आहे.

या मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट हे आहे की, लोकांना दररोज किमान 3 लिटर पाण्याचे संवर्धन करण्यास उद्युक्त करून पाण्याच्या वापर जबाबदारी ने करण्याची संस्कृती वाढवणे आणि वाढत्या तापमानामध्ये हायड्रेशनला प्रोत्साहन देणे.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या मोहिमेमध्ये जलसंधारणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि सामुदायिक सहभागाच्या उपक्रमांचा समावेश आहे. एकात्मता नगर, गंगा नगर, खलासी लाईन, संघर्ष नगर, भीमवाडी, कौशल्यान नगर आदी भागात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला असून, याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.

मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करून चांगली कामगिरी करणाऱ्या उपरोक्त भागातील व्यक्तींची सत्कार करण्यासाठी आम्ही योजना आखली आहे. OCW आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशन नागरिकांना या उदात्त प्रयत्नात हात जोडून जलसंवर्धनासाठी सक्रिय पावले उचलण्याचे आवाहन करतात. एकत्रितपणे, आपण एक शाश्वत भविष्य घडवू शकतो जिथे पाण्याचा प्रत्येक थेंब जपला जाईल आणि जबाबदारीने वापरला जाईल.

Advertisement
Advertisement