Published On : Mon, Aug 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातून ओबीसी जनजागृती मंडलची ९ ऑगस्टपासून होणार सुरुवात, शरद पवार दाखवणार हिरवा झेंडा!

Advertisement

नागपूर : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पुन्हा एकदा जनतेमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. एनसीपी-समाजवादी पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात “ओबीसी जनजागृती मंडल यात्रा” काढण्यात येणार असून, या यात्रेची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथून होणार आहे. खुद्द शरद पवार या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या यात्रेची माहिती पक्षाचे नेते सलिल देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

सलिल देशमुख म्हणाले, “पहिल्या टप्प्यात ही यात्रा विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये जाईल. विविध तहसील ठिकाणी ओबीसी समाजाशी संवाद साधण्यासाठी सभांचे आयोजन केले जाईल. भाजपा सरकारच्या ओबीसीविरोधी धोरणांचा पर्दाफाश आणि शरद पवारांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या कार्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देशमुख यांनी पुढे सांगितले, “मंडल आयोगाचा प्रभाव हा ओबीसी समाजाच्या सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. स्वातंत्र्यानंतर १९५३ मध्ये काका कालेलकर आयोगाची स्थापना झाली होती. मात्र, प्रत्यक्षात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू होऊन ओबीसी समाजाला न्याय मिळायला तब्बल ४० वर्षे लागली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम या शिफारशी लागू करून ओबीसी समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला.”

राजकीय आरक्षण, महापौर, सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा पदांवर ओबीसी तरुणांना संधी मिळाल्याचे देशमुखांनी सांगितले. ते म्हणाले, “हीच मंडल आयोगाची अंमलबजावणी भाजपा नेहमीच अप्रत्यक्षपणे विरोध करत आली आहे. त्यांनी ‘कमंडल यात्रा’च्या माध्यमातून मंडल धोरणाला विरोध केला होता.”

भाजपवर हल्ला चढवत देशमुख म्हणाले, “शिक्षण व नोकऱ्यांमधील ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे. राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. पण भाजपने या मागणीला वेळोवेळी विरोध केला. शेवटी दबावाखाली केंद्र सरकारने घोषणा केली खरी, पण ही जनगणना कधी होणार याबाबत अजूनही कोणताही निर्णय नाही.”

Advertisement
Advertisement