Published On : Fri, Aug 4th, 2017

शाळाशाळांमधून घेतली जाणार शनिवारी कीटकजन्य आजार निर्मूलनाची शपथ

NMC Nagpur

नागपूर: सध्या कीटकजन्य आजारासाठी पारेषण काळ सुरू आहे. अशा किटकांची निर्मितीच होऊ नये यासाठी जनजागरण करण्याच्या दृष्टीने शनिवारी (ता. ५) शहरातील सुमारे १६० शाळांसह मनपा आणि राज्य शासनाच्या कार्यालयात शपथ घेण्यात येणार आहे.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते यांच्यासह संपूर्ण नगरसेवक हे संबंधित प्रभागातील शाळांमध्ये ही शपथ देणार आहेत.

महापौर नंदा जिचकार लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या राणा प्रतापनगर शाळेत शपथ देतील. उपमहापौर दीपराज पार्डीकर सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणाऱ्या कुंदनलाल गुप्ता शाळा, बिनाकी येथे, स्थायी समिती सभापती संदीप जाधव मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या अल अमीन शाळेत, सत्तापक्ष नेते संदीप जोशी हे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या आर. एस. मुंडले विद्यालयात तर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या ज्ञान विकास विद्यालय नंदनवन या शाळेत विद्यार्थ्यांना शपथ देतील. शहरातील अन्य प्रभागामधील शाळांत त्या-त्या भागातील नगरसेवक शपथ देतील.