Published On : Tue, Dec 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगला; पोलिसांनी रितीकला तुरुंगात टाकला

Advertisement

नागपूर : नायलॉन मांजाच्या ३५ चक्री विक्रीसाठी बाळगणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे. रितीक राजाराम शाहु (वय २३, रा. वृंदावननगर, शाहु मोहल्ला, यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कळमना पोलिसांचे पथक सोमवारी २५ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता गस्त घालत होते. त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार त्यांनी मेहता काटा ते चिखली चौक जाणाºया रोडवर फायर ब्रिगेडच्या ऑफीसमागे आरोपी रितीकला त्याची अ‍ॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ४९, बी. एस-४०८७ सह ताब्यात घेतले. तो शासनाने प्रतिबंधीत केलेल्या नायलॉन मांजाच्या ३५ चक्री विक्रीसाठी घेऊन जाताना आढळला. त्याच्याकडून दुचाकी व नायलॉन मांजा असा ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Gold Rate
19 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000/-
Gold 22 KT ₹ 1,22,800 /-
Silver/Kg ₹ 1,98,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपी रितीकविरुद्ध कलम ३३६, १८८, सहकलम ५, १५, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement