| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Feb 15th, 2018

  वाडी येथील जवाहरलाल कॉलेज मधील एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी खडगाव येथे केले श्रमदान,

  वाडी(अंबाझरी): वाडी स्थित जवाहरलाल नेहरू कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातिल राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांचा 7 दिवसीय निवासी कॅम्प वाडी येथून 6 कि मी. अंतरावरील खडगाव येथे उत्साह व सफलता पूर्वक सम्पन्न झाला,या कॅम्प चे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन दोनतुलवर यांचे हस्ते ग्राम पंचायत सरपंच रेखाताई मुन,उपसरपंच किशोर सरोदे,पूर्व सरपंच देवराव कडू, चंद्रशेखर गणवीर यांचे उपस्थितीत करण्यात आले,शिबीर प्रमुख डॉ.मनीषा भातकुलकर यांनी शिबीर आयोजनाचे उद्देश,अनुशासन,व कार्यक्रमाची माहिती दिली.

  या निवासी शिबीरात प्रतिदिन मार्गदर्शन,चर्चा, प्रात्यक्षिक,श्रमदान, आदी कार्यक्रम घेण्यात आले,सुनील ताणदुलकर यांनी व्यक्तिमत्व विकास,डॉ तनवीर मिर्जा यांनी सौरऊर्जा व ग्रीन ऊर्जाचे महत्व,हिंगणा प स तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,डॉ स्वाती चालखोर यांनी महिला पोषण आहार व आरोग्य यावर मार्गदर्शन केले,

  या दरम्यान या शिबारार्थीनी गावात श्रमदान,सफाई अभियान राबविले,माजी सरपंच देवराव कडू व ग्रा,प कडून शिबिरार्थ्यांना आवश्यक साधन व सहकार्य करण्यात आले,शिबीर समापण कार्यक्रमात व्ही एस पी एम संस्थाचे अध्यक्ष रंजितबाबू देशमुख,शासकीय न्यायवैद्यक संस्थाचे संचालक डॉ.जयराम खोब्रागडे,राष्ट्रीय सेवा योजनाचे सदस्य डॉ.नरेन्द्र घारड,प्राचार्य डॉ. जीवन दोंतुलवर प्रामुख्याने उपस्थित होते, संचालन डॉ नरेंद्र घारड,आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.मनीषा भातकूलकर यांनी केले,याप्रसंगी प्रतिष्टीत ग्रामस्थ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145