Published On : Fri, Jan 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

आता मनपा दवाखान्यांतून रुग्णांना मिळणार देशभरातील तज्ञांचे मार्गदर्शन

गोरेवाडा आरोग्य केंद्रात ‘टेलिमेडिसिन’चा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ
Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या दवाखान्यांमधून आता रुग्णांना देशभरातील रुग्णांचे ऑनलाईन मार्गदर्शन मिळणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला सहकार्य दर्शवित डब्ल्यूसीएल च्या सीएसआर निधीमधून मनपा रुग्णालयांमध्ये डिजिस्वास्थ्य फाउंडेशनद्वारे ‘टेलिमेडिसिन’ची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रणालीचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते गोरेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शुक्रवारी (ता.३१) शुभारंभ झाला.

यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डब्ल्यूसीएलचे सीएसआर महाव्यवस्थापक श्री. अनील कुमार, व्यवस्थापक श्री. शेखर रायप्रोलु, मनपा अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतिक खान, डिजिस्वास्थ्यचे सीईओ श्री. संदीप कुमार, गोरेवाडा आरोग्य केंद्रच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शारीना सय्यद, डॉ. रिजवान अहमद आदी उपस्थित होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या गोरेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जागनाथ बुधवारी आरोग्य केंद्रांमध्ये डब्ल्यूसीएल च्या सीएसआर निधीमधून प्रायोगिक तत्वावर ‘टेलिमेडिसिन’ची सुरुवात करण्यात आली आहे. ही प्रणाली डिजिस्वास्थ्य फाउंडेशनद्वारे संचालित करण्यात करण्यात येणार आहे. मनपा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या ज्या रुग्णाला तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल त्यांना ‘टेलिमेडिसिन’मार्फत तज्ज्ञांकडून मोफत सल्ला देण्यात येईल. रुग्णाला पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील उपचार करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना (पीएम-जेएवाय) यासारख्या केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा देखील लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यासाठी देशातील विविध भागातील स्त्रीरोग तज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, डर्मेटोलॉजिस्ट, इएनटी, डेंटिस्ट, ग्रॅस्ट्रोनेट्रोलॉजी, हृदयरोगतज्ज्ञ, ऑप्थॅमोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, फिजिओथेरेपिस्ट, डायटियन, जनरल मेडिसिन आणि बालरोगतज्ञांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते आठवड्यातील निर्धारित दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सेवा देतील. रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि उपचाराबाबत नियमित फॉलोअप देखील घेतले जाणार आहे.


यावेळी बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आरोग्य सेवेसाठी महत्वाचा पुढाकार घेतल्याबद्दल डब्ल्यूसीएसचे विशेष आभार व्यक्त केले. मनपाच्या गोरेवाडा आणि जागनाथ बुधवारी या आरोग्य केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर ‘टेलिमेडिसिन’ सेवा सुरु करण्यात येत आहे. पुढील तीन महिले याचे मूल्यांकन करुन त्याचा रुग्णांना मिळणारा लाभ लक्षात घेऊन पुढे मनपाच्या इतरही आरोग्य केंद्रांमध्ये ‘टेलिमेडिसिन’ सुरु करण्यासाठी डब्यूसीएलचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्तांनी डिजिस्वास्थ्यच्या चमूचे अभिनंदन करताना त्यांना त्यांच्या दर्जेदार आरोग्य सेवेचा दर्जा कायम ठेवून नागपूर शहरातील जास्तीत जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरविण्याबाबत आवाहन केले. मनपा आरोग्य विभागाची चमू, डिजिस्वास्थ्यची चमू यांनी समन्वयातून जास्तीत जास्त रुग्णांना या सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती करण्याचे देखील आयुक्तांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या चमूने अथक परिश्रम घेतले.

‘टेलिमेडिसिन’ प्रकल्पाच्या अंतर्गत तज्ञ टेलिकन्सल्टेशन, उपचार मार्ग मार्गदर्शन, रेफरल आणि फॉलो-अप सपोर्ट, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा जागरूकता, निरोगी जीवनशैली मार्गदर्शन, सम्पदेशन आणि वर्तणुकीय समर्थन या सेवा पुरविण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे रुग्णांना देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे सहजरित्या नि:शुल्क मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. तपासणीमध्ये पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्याबाबतचे सर्व मार्गदर्शन आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून उपचार देखील करण्यात येणार आहे.

गोरेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून सोमवारी स्त्रीरोग तज्ज्ञ, मंगळवारी न्यूरोलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, बुधवारी ऑर्थोपेडिक्स, गुरुवारी डर्मेटोलॉजिस्ट, ईएनटी, डेंटिस्ट, शुक्रवारी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हृदयरोगतज्ज्ञ, ऑप्थॅमोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट आणि शनिवारी फिजिओथेरेपिस्ट, डायटियन, जनरल मेडिसीन हे तज्ज्ञ सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आपली सेवा देणार आहेत.

Advertisement
Advertisement