Advertisement
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये कुख्यात गुंड हाजी सरवर याच्यावर शहरातील बिनबा गेट परिसरातील शाही दरबार हॉटेलमध्ये अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबारासह चाकूच्या मारामारीत हाजी सरवर गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. चंद्रपूर शहर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात गोळीबाराची ही चौथी घटना असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात हाजी आणि इतर गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे हा गोळीबार झाला. हाजी आपल्या साथीदारांसह हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला असता अज्ञातांनी गोळीबार सुरू केला.