Advertisement
नागपूर : शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेने मानकापूर पोलिस हद्दीतील एका कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी देशी बनावट पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूसे जप्त केली. अमीर शेख बशीर शेख (३२, रा. प्लॉट क्रमांक ५६, मिनिमाता नगर, गोधनी रोड, मानकापूर) असे आरोपी गुंडाचे नाव आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री मानकापूर येथील आरोपीच्या घरावर छापा टाकला. या झडतीदरम्यान पोलिसांना त्याच्याजवळ 50,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3,000 रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे सापडली. आरोपीविरुद्ध शस्त्र कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी अमीर शेख बशीर शेख याला पुढील कारवाईसाठी मानकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.