Published On : Wed, May 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील सक्करदरा येथे कुख्यात अमली पदार्थ तस्कराला अटक; 5.08 लाख रुपयांची एमडी जप्त

Advertisement

नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी पहाटे कुख्यात अमली पदार्थ तस्कर इक्बाल शेख याला अटक केली. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून 5.08 लाख रुपये किमतीचे 50.81 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक गस्तीवर असताना त्यांनी जुना बिडीपेठ येथील इकबाल (40) याला अडवले.यानंतर त्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांना त्याच्याजवळ सुमारे 50 ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले.महत्त्वाचे म्हणजे इक्बालवर अगोदरच एनडीपीएस कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चौकशीदरम्यान इक्बालने पोलिसांना सांगितले की, मोठा ताजबाग येथील रहिवासी इस्तियाक खादीम आणि वसीम उर्फ गुड्डू यांनी एमडी ड्रग्ज मिळवण्यासाठी त्याला मदत केली होती. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी आरोपी इक्बालविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(सी), 22(बी), 29 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला.

Advertisement

दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय गजानन गुल्हाणे, एपीआय सिद्धार्थ पाटील, पोलिस कॉन्स्टेबल मनोज नेवारे, नितीन साळुंखे, पोलिस अमलदार रोहित काळे, सुभाष गजभिये यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.