Published On : Thu, May 3rd, 2018

पी.सी.पी.एन.डी.टी. कायदयाचे उलंघन करणा-या 34 सोनोग्राफी सेंटरला नोटीस

नागपूर: नागपूर शहरात एकुण ५८० सोनोग्राफी सेंटर असून नागपूर महानगरपालिकेतर्फे दि. २ एप्रिल ते २७ एप्रिल २०१८ दरम्यान शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागपूर शहरातील सर्व सोनोग्राफी सेंटरची आकस्मीक तपासणी मोहिम राबविण्यात आली. या तपास पथकामध्ये म.न.पा.चे वैदयकीय अधिकारी, पोलिस अधिकारी व महसूल विभागाचे अधिका-याचा व अन्य अधिका-याचा या तपासणी चमुत सहभाग होता. या तपासणी मोहिमेत शहरातील सोनोग्राफी सेंटर, रेडीओलॉजी, गॉयक्नोलॉजी, इको मशीन, नेत्र तपासणी मशीन, एम.आर.आय., सिटी स्कॅन व बीस्कॅन मशीन तपासणी धडक मोहिम राबविण्यात आली.

या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी पी.सी.पी.एन.डी.टी. जिल्हा सल्लागार समिती सभा व्ही.आय.पी. रोड, डीग दवाखाना धरमपेठ येथील मुख्यालयात संपन्न झाली. या बैठकीला म.न.पा. च्या नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, समिती सदस्य प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, राज्य शासन सल्लागार समितीच्या सदस्य डॉ. वर्षा ठवळे, महाराष्ट्र राज्य रेडीओलॉजी असोशेएशन अध्यक्ष डॉ. प्रशांत ओंकार, समितीचे सदस्य व महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. अशोक कोल्हटकर, सुप्रसिध्द जेनेसीस्ट डॉ.विणय टुले, वसुंधरा स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधी श्रीमती विणा खानोरकर आदी सल्लागार समितीचे सदस्य आवर्जून उपस्थित होते.

या तपासणी मोहिमे अंतर्गत 34 विविध सेंटरवर पी.सी.पी.एन.डी.टी. कायदया अंतर्गत अनेक प्रकारच्या तृटया आढळून आले. तपासणी दरम्यान सेंटरवर पी.सी.पी.एन.डी.टी. कायदयाचे पुस्तक नव्हते, मशीनवर एम.आर.सी. नंबर नव्हते, एफ फार्मवर अनेक तृटया आढळल्या व अनेक सेंटरवर तपासणीच्या नोंदी नव्हत्या तसेच सोनोग्राफी मशीन इतरत्र हलविताना समितीची पूर्व परवानगी घेतली नसल्याचे या तपासणी दरम्यान आढळून आल्याणे संबंधीतांना नोटीस देण्यात आले. म.न.पा.चे अप्पर आयुक्त श्री. रविंद्र कुंभारे यांनी जिल्हा दक्षता समितीची तातडीची सभा बोलवून ज्या सेंटरचे लेखी स्वरुपात उत्तर प्राप्त नाही अश्या सेंटर प्रमुखाला प्रत्यक्ष बोलवून ज्यांचे लेखी उत्तर प्राप्त नाही अश्यांना सक्त ताकीद दया. मा.अपर आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे तृटया आढळलेल्या सेंटर प्रमुखांना धरमपेठ डीक दवाखाना व्ही.आय.पी. रोड धरमपेठ स्थित मुख्यालयात प्रत्यक्ष बोलावून त्यांना स्पष्टीकरण घेण्यात आले. पी.सी.पी.एन.डी.टी. कायदया अंतर्गत जर पुन्हा अशा तृटया आढळल्यास व कायदयाचे पालन न करणा-या सेंटर बंद करुन मशीन सिल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ताकीद देण्यात आले.

Notice to 34 Sonography Centre for violating the PCPNDT law
त्यानुसार सर्व सेंटर प्रमुखांना प्रत्यक्ष बोलावून त्यांचा कडून स्पष्टीकरण लेखी स्वरुपात घेण्यात आले. यापूढे कायदयाचे पालन करणार नाही किंवा दिरंगाई तृटया आढळयास कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सर्व सेंटर प्रमुखांना कळविण्यात आले तसेच ताकीदसुध्दा सर्वांना देण्यात आली.