Published On : Thu, Jun 18th, 2020

तीन दिवसात घरांचे अवैध बांधकाम हटवा मनपा आयुक्तांची नोटीस

नागपूर: इमामवाडा वस्तीतील आयसोलेशन रुग्णालयांच्या उत्तरेकडील भिंतीला लागून असलेल्या 13 घरांचे अवैध घरे येत्या दिन दिवसात हटवा, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनातर्फे संबंधित झोनवासियांना बुधवारी याबाबतची नोटीसही बजावण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली.

मनपाच्या मते, प्रभाग क्र. 17-अ मधील आयसोलेशन रुग्णालयाजवळून वस्तीच्या आतमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जागेवर हे अतिक्रमण उभारण्यात आले आहे. जे की, नियमाच्या विरुद्ध आहे. नागरिकांनी ही अवैध घरे न पाडल्यास मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून अतिक्रमणधारी नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सध्या घोंगावणारे कोरोना संकट आणि पावसाची रिपरिप अशा स्थितीत कोठे जायचे, असा प्रश्न येथील नागरिकांना सतावतो आहे. या 13 घरांमध्ये जवळपास 70 नागरीक राहत आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या संचारबंदीने हातातला रोजगार हिरावल्या गेला.

Advertisement

संचारबंदी काहीही शिथील झाली असली तरी, हाताला काम मिळालेले नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाने आपल्याला बेघर केले तर, मुलाबाळांना घेऊन कुठे जायचे, हा प्रश्न संबंधित नागरिकांना सतावतो आहे. कोरोनाची परिस्थिती आणि पावसाळा बघता प्रशासनाने आपल्याला घरे हटविण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ द्यावी अथवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी स्ािानिक नगरसेवक विजय चुटेले यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement