Published On : Tue, Jul 30th, 2019

आगंणवाडी सेविकांचे असहकार आंदोलन सुरू

Advertisement

कन्हान : – पारशिवनी तालुका अंतर्गत कन्हान सर्कल च्या आंगणवाडी सेविकां नी त्यांच्या न्यायीक मागण्या पुर्ण करण्यात याव्या म्हणुन अहवाल मिटींग वर असहकार आंदोलन सुरू करून ९ ऑगस्ट ला जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सोमवार (दि.२२) पासुन पारशिवनी तालुक्यातील कन्हान सर्कल च्या आंगणवाडी सेविका हयानी कॉ. श्याम बाबु काळे सरचिटणीस आयटक महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात आणि सौ सुनिता मानकर अध्यक्ष पारशिवनी तालुका व सहसचिव नागपुर जिल्हा यांच्या अध्यक्षेत अहसहकार आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. यात काळी फित लावुन कुठलीही माहीती सुपरवायझर व सीडीपीओ ला देणार नाही जोपर्यंत शासन वाढीव मानधनाचा निर्णय घेत नाही.

पेंशन महिलांना अर्धा मानधन स्वरूपात देत नाही. तोपर्यंत काम असहकार रित्या सुरू राहील. कुठलीही माहीती मोबाइल वरून ऑनलाइन करणार नाही. मानधन प्रत्येक महिन्याला ५ तारखेपर्यत आले पाहिजे. जुन महिन्याचे मानधन अद्याप आले नाही. तसेच कन्हान सर्कल च्या आंगणवाडयात शौचालय, नळ, इलेक्ट्रिक फिटींग व इतर सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी आंगणवाडी सेविकांनी केली आहे.

आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर ९ ऑगस्ट ला कॉ श्यामबाबु काळे सरचिटणीस आयटक महाराष्ट्र यांच्या अध्यक्षेत ” जेल भरो ” आंदोलन करण्याचा इशारा आंगवाडी सेविकांनी दिला आहे.