Published On : Fri, Feb 26th, 2021

विशेष समित्यांसाठी नामांकन दाखल, निवडणुक १ मार्च ला

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या विविध विशेष समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २६) उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. प्रत्येक विषय समितीच्या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एकच नामांकन आल्याने ही निवड अविरोध होईल. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा १ मार्च रोजी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री.रविन्द्र ठाकरे करतील.

स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापतीपदासाठी राजेंद्र सोनकुसरे यांनी तर उपसभापतीपदासाठी निशांत गांधी यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापतीपदासाठी महेश (संजय) महाजन यांनी तर उपसभापतीपदासाठी विक्रम ग्वालबंशी, विधी व सामान्य प्रशासन विशेष समिती सभापतीपदासाठी ॲड. मिनाक्षी तेलगोटे तर उपसभापती पदासाठी वनिता दांडेकर यांनी नामांकन दाखल केले. शिक्षण विशेष समिती सभापती पदासाठी प्रा. दिलीप दिवे यांनी तर उपसभापती पदासाठी सुमेधा देशपांडे यांनी अर्ज सादर केला. गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समिती सभापती पदासाठी हरिश दिकोंडवार यांनी तर उपसभापती पदासाठी रुतिका मसराम यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले.

क्रीडा विशेष समिती सभापती पदासाठी प्रमोद तभाने यांनी तर उपसभापती पदासाठी लखन येरावार यांचा अर्ज प्राप्त झाला. महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी दिव्या धुरडे यांचा तर उपसभापती पदासाठी अर्चना पाठक यांचे नामांकन प्राप्त झाले. जलप्रदाय विशेष समिती सभापती पदासाठी संदीप गवई यांनी तर उपसभापती पदासाठी सरला नायक यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती पदासाठी महेंद्रप्रसाद धनविजय यांनी तर उपसभापती पदासाठी सुनील अग्रवाल यांनी नामांकन दाखल केले. अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती पदासाठी दीपक चौधरी यांचे तर उपसभापती पदासाठी किशोर वानखेडे यांचे नामांकन प्राप्त झाले असल्याची माहिती निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी दिली. यावेळी अधीक्षक समिती दत्तात्रय डहाके, सुरेश शिवणकर, विलास धुर्वे यांनी सहकार्य केले.