लाखो विदयार्थ्यांचे नुकसान करण्याचा कुणालाच अधिकार नाही- अजित पवारांनी सरकारला ठणकावले

नागपूर: मुंबई विदयापीठाच्या निकालामध्ये झालेल्या घोळासंदर्भात आज विधानसभेमध्ये विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी मांडली.

विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई विदयापीठाच्या निकालामध्ये झालेल्या घोळाबाबत सभागृहामध्ये मुंबई विदयापीठाच्या निकालामध्ये घोळ घालणाऱ्या मेरीट ट्रॅक कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र त्याच्याशी करारनामा झाला नव्हता अशी माहिती तंत्र व शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेमध्ये दिली. झालेल्या घोळाबाबत प्रधान सचिव,माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी स्थापन केली आहे.

या समितीचा अहवाल तीन महिन्यात येईल. अहवाल आल्यानंतर दोषींवर गुन्हा दाखल करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती रविंद्र वायकर यांनी सभागृहाला दिली. मात्र लाखो विदयार्थ्यांचे नुकसान झाल्यानंतर समिती नेमून चौकशी करण्यात अर्थ नाही. सरकारने टेंडर देतानाच कडक नियम व अटी करणे गरजेचे होते. या घोळामुळे अनेक विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

त्यामुळे कंपनीच्या संचालकावर कडक कारवाई करायलाच हवी. फक्त कुलगुरुंना घरी पाठवून चालणार नाही तर शिक्षण राज्यमंत्री,शिक्षण मंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. लाखो विदयार्थ्यांचे नुकसान करण्याचा अधिकार कुणालाच नाही असे ठणकावून सरकारला सांगितले.