गुरुग्राम : गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी होणारी धावपळ आणि प्रतीक्षा कमी करण्यासाठी भारत पेट्रोलियम (BPCL) कंपनीने एक अभिनव पाऊल उचलले आहे. गुरुग्राममध्ये देशातील पहिले LPG ATM सुरू करण्यात आले असून, ग्राहकांना आता कधीही आणि जलद गॅस सिलेंडर मिळणार आहे.
सोहना भागात सुरू करण्यात आलेले हे अत्याधुनिक मशीन पूर्णपणे स्वयंचलित असून, २४ तास ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे. या यंत्राद्वारे अवघ्या काही मिनिटांत भरलेला गॅस सिलेंडर मिळवणे शक्य होणार आहे.
सिलेंडर घेण्याची प्रक्रिया देखील सोपी ठेवण्यात आली आहे. ग्राहकांनी आपला रिकामा सिलेंडर मशीनमध्ये जमा करायचा, त्यानंतर मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे ओळख पडताळणी, QR कोड स्कॅन करून डिजिटल पेमेंट केल्यावर लगेच नवीन सिलेंडर मिळतो.
यामध्ये पारंपरिक लोखंडी सिलेंडरऐवजी हलके, सुरक्षित आणि वापरण्यास सोपे असे कंपोझिट सिलेंडर दिले जात आहेत.
ही योजना सध्या प्रायोगिक स्वरूपात (पायलट प्रोजेक्ट) सुरू करण्यात आली आहे. यशस्वी ठरल्यास देशातील इतर शहरांमध्येही ही सुविधा विस्तारण्याची शक्यता आहे.
गॅस पुरवठ्यातील अडचणी लक्षात घेता, ही आधुनिक सेवा ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे चित्र आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate





