Published On : Mon, Dec 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नको पोकळ घोषणा, ६० हजार शिक्षक भरती करा..; आमदार रोहित पवारांची मागणी

Advertisement

नागपूर : आमदार रोहित पवार सोमवारी विधानभवनात येत ६० हजार शिक्षक भरती करण्याची मागणी केली आहे. नको पोकळ घोषणा ६० हजार शिक्षक भरती करा, समूह शाळा दत्तक शाळा म्हणजे सरकारच्या पोकळ खेळ, गरीब विद्यार्थ्यांवर कशाला आणताय वाईट वेळ असा मजकूर लिहीलेले जॅकेटही पवार यांनी घातले होते.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन अधिशनामध्ये शिक्षक भरतीचे आश्वासन दिले.मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. महाराष्ट्रातील हिऱ्यासह मोठमोठे उद्योग गुजरातला हलवले जात आहे. त्यानंतरही हे सरकार झोपेत आहे. सध्याची स्थिती पाहता राज्य सरकार गुजरातच्या दावणीला बांधलेले दिसते, अशा शब्दात रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.