
नागपूर : कोव्हिड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने कोव्हिड-19 हे अँप नागपूर शहरातील नागरीकांसाठी तयार करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन सदर अँप डाऊनलोड करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, अँप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्वत:च्या आजाराविषयी माहिती भरावी. या अँपमध्ये काही प्रश्न विचारले जातील त्यानुसार संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावे. सदर भरलेल्या माहितीच्या आधारे कोव्हिड-१९ ची लक्षणे असल्यास मनपाच्या डॉक्टरांना कळेल. त्या माहितीच्या आधारे मनपाचे डॉक्टर संबंधितांशी संपर्क करुन पुढील कार्यवाही करतील, असे त्यांनी सांगितले.
‘कोव्हिडं-19’ अँप लिंक
कोव्हिडं-19′ अँप डाउनलोडल करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1abB97jEnkrzvIzcOY0eebr_wcQ8tT_sJ/view?usp=drivesdk ही लिंक क्लिक करावी लागेल. मात्र सदर अँप फक्त कोव्हिड- १९ चे लक्षणे जसे ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास असणा-या नागरिकांसाठी आहे. इतरांनी सदर अँपचा वापर करु नये, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ही अँप ७२ तासानंतर गुगल प्ले स्टोर वर नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
रामरक्षा पाठ को लेकर BJP vs Uddhav ठाकरे आमने-सामने #UddhavThackeray #BJP #RamRaksha...
Nagpur Murder Case: सुपारी किलिंग में बड़ा खुलासा #NagpurNews #MurderCase #SupariKilling #CrimeNews
संगम चॉल में हंगामा, पुलिस से हाथापाई #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #KnifeAttack #newsupdate
समृद्धि महामार्ग पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #SamruddhiMahamarg #RoadAccident #AccidentNews #news
एक ही बैंक में खोले 14 बैंक अकाउंट #vidarbhanews #nagpur #crimenews #maharashtranews...
महिला के विरोध पर ड्राइवर का गुस्सा! #NagpurNews #Crime #PoliceAction #ViralNews #MaharashtraNews




