Published On : Fri, Apr 14th, 2023
By Nagpur Today Nagpur News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

Advertisement

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल रोजी सकाळी मनपा मुख्यालयातील इमारतीच्या दालनात भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी अभिवादन केले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, मुख्य अभियंता श्री.राजीव गायकवाड, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, उपायुक्त श्री.प्रकाश वराडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक श्री. महेश धामेचा, सहायक आयुक्त श्री. विजय हुमने, शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी श्री.बी.पी. चंदनखेडे उपस्थित होते.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर आयुक्तांनी नागपुरातील संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने व अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी उपस्थित होते.

Advertisement

मनपा आयुक्तांनी नागपूरकरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, बाबासाहेबांनी आपल्यासाठी तयार केलेले संविधान सर्वोत्तम असून आपण सगळ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि सर्वजण समानतेने कसे राहू शकतील यासाठी बाबासाहेबांनी कार्य केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.