Published On : Mon, Jan 14th, 2019

राष्ट्रमाता मॉसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी

कन्हान : – नगर परिषद कन्हान पिपरी परिसरात राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची सयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचार आत्मसात करुन देशाचा प्रगतीत सहयोग करावे असे आव्हान केले.

या प्रसंगी नगरसेवक मनोज कुरडकर, अजय लोंढे, राजू शेंदरे, कार्यकर्ता कामेश्वर शर्मा,महादेव लिल्हारे, मयूर माटे, संतोष ठकरेले, चंदन मेश्राम, दिनेश ठाकरे, किरण ठाकुर, शैलेष शेळके, हर्ष पाटिल, रिंकेश चवरे, गणेश सोनेकर, महेश बढेल, विक्की ऊके, आशीष यादव, धिरज देवांगन, सुनील आगुडलेवार, कवडू मेश्राम, विक्की नवघरे, विजय शेन्दूरकर, आनंद शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.