Advertisement
नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी महाल येथील गडकरी वाडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
गडकरी वाडा येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. या वेळेत नितीन गडकरी नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.
नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी आणि मागण्यांची लेखी निवेदने आवश्यक कागदपत्रांसह आणावीत आणि ती मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दुपारी १ ते २ वाजेपर्यंत गडकरी आपल्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.




