Published On : Fri, Mar 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातून नितीन गडकरीच लोकसभेचे उमेदवार हवे ; भाजप पदाधिकाऱ्यांची ठाम भूमिका

Advertisement

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक खा. मनोज कोटक व माजी खासदार अमर साबळे हे नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली. यादरम्यान सर्वच पदाधिकाऱ्यांनी नागपुरातून नितीन गडकरीच लोकसभेचे उमेदवार असल्याचे सांगितले आहे.

भाजपकडून जास्त जागा लढण्याची तयारी असल्याच्या चर्चा सुरू असताना मागील वेळी जिंकलेल्या २३ जागांसाठी पक्षाने निरीक्षक नियुक्त केले आहे. संबंधित मतदारसंघात जाऊन तेथील पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून आढावा घेण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर देण्यात आली आहे. याच प्रक्रियेत कोटक व साबळे नागपुरात आले होते.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुरुवारी दुपारी भाजप कार्यालयात शहरातील ७० प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. भाजयुमोच्या महासंमेलनासाठी व्यस्त असल्याने ५५ पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. सुरुवातीच्या नियोजनानुसार निरीक्षक प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घेणार होते व त्यात कुणाला उमेदवारी दिलेली जास्त संयुक्तिक ठरेल अशी विचारणा होणार होती. त्यानंतर प्रत्यक्ष संवाद साधण्याचे ठरविण्यात आले.

त्यानंतर शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना नितीन गडकरी हेच उमेदवार म्हणून हवे असल्याचे सांगितले. दोन्ही निरीक्षकांनी शहरातील पक्ष संघटन, निवडणूकीची तयारी याबाबतदेखील धावता आढावा घेतला. ही भूमिका आता पक्षनेतृत्वाला कळविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

या बैठकीला आमदार, माजी आमदार, माजी खासदार, विधानसभा क्षेत्रप्रमुख, निवडणूक प्रमुख, प्रदेश महामंत्री इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
महाबलेश्वर में 3000mm पार बारिश! #Mahabaleshwar #Monsoon #HeavyRain #RainUpdate #MaharashtraNews

महाबलेश्वर में 3000mm पार बारिश! #Mahabaleshwar #Monsoon #HeavyRain #RainUpdate #MaharashtraNews

पहली बार सावंतवाड़ी में रुकी मंगलूरू एक्सप्रेस! #Express #Sindhudurg #TrainNews #RailwayNews #news

पहली बार सावंतवाड़ी में रुकी मंगलूरू एक्सप्रेस! #Express #Sindhudurg #TrainNews #RailwayNews #news

मंदिर प्रबंधन धर्माचार्यों को सौंपने की मांग #NarendraAcharya #RamMandir  #Ratnagiri #EducationNews

मंदिर प्रबंधन धर्माचार्यों को सौंपने की मांग #NarendraAcharya #RamMandir #Ratnagiri #EducationNews

प्रेम संबंध के विवाद में हुआ था खूनी संघर्ष #NagpurCrime #Crime #Police  #IllegalWeapon #Arrest

प्रेम संबंध के विवाद में हुआ था खूनी संघर्ष #NagpurCrime #Crime #Police...

अदरक के दाम गिरने से किसान परेशान #maharashtranews #newsupdate #kisan #latestnews

अदरक के दाम गिरने से किसान परेशान #maharashtranews #newsupdate #kisan #latestnews

हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल

हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges