Published On : Tue, Jul 30th, 2019

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला न्यायालयाचा दणका

Advertisement

नागपूर : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला सोमवारी जोरदार दणका बसला. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. निशांत ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर शाखेत अभियंता होता. येथील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला उत्तर प्रदेश एटीएसने ८ आॅक्टोबर २०१८ रोजी नागपूर येथून अटक केली होती.

त्यानंतर निशांतच्या संगणकात गोपनीय माहिती आढळून आली होती. तो एका महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यातून तो त्या महिलेला गोपनीय माहिती पुरवित होता. ती माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचत होती. नागपूरजवळच्या मोहगाव येथे डीआरडीओचा ब्रह्मोस मिसाईल प्रकल्प आहे.

हा प्रकल्प भारत व रशियाच्या संयुक्त तंत्रज्ञानावर आधारित आहे. निशांततर्फे अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.