नवी दिल्ली: मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा –
– देशात रोजगार आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 2 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीसह तरुणांसाठी 5 योजनांची घोषणा करण्यात आली आहे. याचा 5 कोटींहून अधिक तरुणांना फायदा होणार आहे. रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
– कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा फायदा(Union Budget 2024 ) शेतकरी आणि त्यांच्या जमिनींना होईल.
– अर्थसंकल्पामध्ये बिहारला 3 एक्सप्रेसवे मिळाले. 26 हजार कोटी रुपये खर्चून हे नवीन रस्ते बांधण्यात येणार आहेत. गयामध्ये इंडस्ट्रियल हब बनवण्यात येणार आहे.
-देशात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना EPFO मध्ये त्यांच्या योगदानानुसार प्रोत्साहन मिळेल. 30 लाख तरुणांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना 15 हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे.
मुद्रा कर्ज मर्यादा वाढली आहे. आता या योजनेंतर्गत 10 ऐवजी 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
-प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी, कंपन्यांना (Union Budget 2024 ) 2 वर्षांसाठी दरमहा 3-3 हजार रुपये प्रतिपूर्ती मिळेल. याचा फायदा 50 लाख जणांना होणार आहे.
-फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत 15,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार. एक लाख रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी यासाठी पात्र असतील.
-ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
– शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी(Union Budget 2024 ) डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल.या वर्षी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 औद्योगिक उद्यानांची घोषणा केली आहे.










